Tuesday, 24 May 2016

शालेय स्पर्धा परीक्षाविविध शालेय परीक्षांची माहितीअ. क्र.परीक्षेचे नावपात्रता लाभार्थी विद्यार्थीआवेदनपत्र भरण्याचा कालावधीपरीक्षेचा कालावधी महिना
१पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाwww.mscepune.inमहाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळेत इ. ४थी मधील विहित वयोगटातील विद्यार्थीऑगस्टफेब्रुवारी / मार्च
२माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षाwww.mscepune.inई . ७ वीऑगस्टफेब्रुवारी / मार्च
३शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाwww.mscepune.inम. रा . ग्रामीण भागातील इ. ४ थी मधील फक्त मुलेऑगस्टफेब्रुवारी / मार्च
४आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशपरीक्षाwww.mscepune.inआदिवासी क्षेत्रातील रहिवासी असणारे अनुसूचित जमातीचे इ. ४थी मधील फक्त मुलेऑगस्टफेब्रुवारी / मार्च
५विमुक्त जाती व अ. जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाwww.mscepune.inआश्रमशाळेतील इ. ४थी मधील विद्यार्थीऑगस्टफेब्रुवारी / मार्च
६जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.inइ . ५ वीसप्टेबरफेब्रुवारी
७जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.inइ. ८ वीसप्टेबरफेब्रुवारी
८सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा (सातारा )www.sainik.satara.orgइ. ५ वी फक्त मुलेऑक्टोबरफेब्रुवारी / मार्च
९राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज , डेहराडूनwww.irmc.orgइ. ७ वी / इ. ८ वी फक्त मुलेजूनजून/डिसेम्बर
१०राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षाwww.mscepune.inइ. ८ वीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १,५०,००० /-सप्टेबरनोव्हेंबर ३ रा रविवार
११श्री शिवाजी मिलिटरी स्कूल , पुणे व नाशिकwww.irmc.orgइ. ४ थीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १००००/-सप्टेबरएप्रिल
१२सांस्कृतिक प्रज्ञाशोध परीक्षाwww.mscepune.inप्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी
१३राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.inप्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थीसप्टेबरनोव्हेंबर
१४राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.inराज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीमार्चमे
१५राष्ट्रभाषा हिंदी परीक्षाइ. ५ वी ते ८ वी चे विद्यार्थीजुलैजुलै /सप्टेबर
१६डॉ . होमीभाभा कालवैज्ञानिक परीक्षाइ. ६वी ते ९ वी चे विद्यार्थीडिसेंबरसप्टेबरफेब्रुवारी
१७गणित ऑलम्पियाडइ. ९वी , १०वी , व ११ वीडिसेंबर
१८एलिमेंटरी /इंटरमिजिएट चित्रकला परीक्षाइ. ७वी ते ९ वी चे विद्यार्थीजुलैफेब्रुवारी
१९क्रीडा प्रबोधिनी पुणेइ. २री ते ८ वीमार्च
२०मुलांची सैनिकी शाळाइ. ५वीऑक्टोबरडिसेंबर
२२गणितइ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )जानेवारीमार्च
२३गणितइ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )जानेवारीमार्च

टिप :-- या परीक्षांचा कालावधी व नियोजनामध्ये कमी-अधिक बदल होऊ शकतो , यासाठी कार्यालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावरून माहिती घ्यावी

Monday, 23 May 2016

वर्षभरातील दिनविशेष
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == बालिका दिन
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन————————————————————————–
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन————————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन————————————————————————-
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन————————————————————————-
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन

०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन————————————————————————-
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२० जून == पित्र दिन
21 जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन————————————————————————-
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन————————————————————————-
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन—————————————————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०५ सप्टेंबर == शिक्षक दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन————————————————————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस————————————————————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन——————————————————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन२३ डिसेंबर == किसान दिन२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

Thursday, 19 May 2016

अहिराणी 
जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीचा वापर केला आहे.
कोंकणी 
कोकणी या नावाने ओळखल्या जाणार्‍या दहाहून अधिक बोली आहेत. आगरी, चित्पावनी, ठाणा जिल्ह्यातली वारली, रत्‍नागिरी जिल्ह्यातली कुडाळी, सिंधुदुर्गातली मालवणी, गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती काणकोणची कोकणी, तिथल्याच शेतमजुरांची कोकणी, गोव्यातल्या ख्रिश्चनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, कारवारी या सर्व बोली ठोकरीत्या कोकणी बोली समजल्या जातात, पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या बोलींपैकी गोव्यातल्या एका बोलीला राज्यभाषा केले आहे. 
कोल्हापुरी 
कोल्हापूर भागात बोलली जाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो.
चंदगडी 
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाजारास गेल्लो'(मी बाजारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
झाडीबोली 
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
डांगी, तंजावर मराठी, तावडी
जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समजत असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
देहवाली 
भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे.. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेचे खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
नंदभाषा 
व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आजही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेचा वापर करून शंकराची स्तुती करणार्‍या काव्यरचनाही केल्या आहेत.
नागपुरी 
पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर चा काही भाग आणि गडचिरोली चा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्‍हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्‍हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
नारायणपेठी बोली
महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.
बेळगावी
बेळगाव या महाराष्ट्राच्या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. जसे काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
भटक्‍या विमुक्त
जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्‍या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातील डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
मराठवाडी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यंतत ही बोलीभाषा वापरली जाते. काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेचाचा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'लास', 'आव' या स्वरूपाचे कारकवाचक प्रत्यय या बोलीचे वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, चाल्लास, ठिवताव इत्यादी.
माणदेशी, मॉरिशसची मराठी, मालवणी 
दक्षिण रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
वर्‍हाडी -
बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला जातो. जसे, 'नदीच्या गायात, गाय फसली' (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.

Saturday, 7 May 2016

मनोरंजक


विद्यार्थ्यांना अध्ययन निरसवाने वाटू नये म्हणून आपण अधूनमधून काही मनोरंजक खेळ घ्यावेत.तसेच या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे देण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी काही खेळ मी आपल्या समोर मांडत आहे.———————————————————————————————————
01.  स्मरणखेळ
विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो.हा खेळ घेताना टेबलावर २० –२५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा.मोबाईल,पेन,पेन्सील ई.आणि त्यावस्तू मुलांना दाखवाव्यात.मुलांना त्यावस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.नंतर त्यावस्तू कापडाने झाकून ठेवाव्यात.नंतर मुलांना लांब लांब बसून त्यावस्तू लिहायला सांगाव्या.त्यावस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.जेणे करून मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.——————————————————————————————————–
02.   ओंजळीने ग्लास भरणे  
मुलांना या खेळात फार आनंद मिळतो.प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत.नंतर समान आकाराचे गटातील संख्येनुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेतसमान अंतरावर ठेवावे.त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.मुलांना त्याबादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लासमध्ये टाकावे लागेल.ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल.या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल.
——————————————————————————————————–
03.  ठराविक वेळेत गणिते सोडवणे    –
मुलांना आपण २० - २५ बेरीज,वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २० - २५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतो आणि ४ - ५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो.त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षित आहे.सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे.अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.——————————————————————————————————–
04.  एकमेकांना हसवणे  –
मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा.काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकी एकाने येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा.मात्र त्यांना हसवताना हातलावायचा नाही.वेगवेगळे हावभाव,वेगवेगळे आवाज काढून,विनोद सांगून त्यांना हसवावे.जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.——————————————————————————————————–
05.    आवाज  ओळखणे  –
एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नाव घेऊन बोलवावे.त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे.जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा.असे सर्व मुले होईपर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.——————————————————————————————————–
06. खोक्यातील वस्तू ओळखणे  –
 एक मोठे खोके घ्यावे.त्यात लहान लहान बॉल,पेन,पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे.नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू  ओळखाव्या.
———————————————————————————————————–
07. वासावरून वस्तू ओळखणे  –
बाजारात प्लास्टिकचे ग्लास मिळतात ते आपण आणावे.पण ते ग्लास पारदर्शक नसावेत . नंतर एका – एका ग्लासात कांदा, लसुन अश्या प्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा.त्यावर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान –लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.—————————————————————————————————–
08.   फुगे फोडणे   –
लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो.या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा . पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे . असा नियम ठेवावा . दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.———————————————————————————————————–
09.  बॉल फेकून मारणे    – 
या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे . एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे . त्यांच्या हातात ३ प्लास्टिकचे बॉल द्यावेत . प्रत्येकाला ३ - ३ बॉल मारता येतील . तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा . जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत . सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.———————————————————————————————————–
10.  नेमबाजी   –
ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉलने नेम मारावा . प्रत्येकाला ३ - ३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत . जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा .———————————————————————————————————–
11.  विद्यार्थी ओळखणे  –
एका ओळीत ठराविक १० - १५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी . नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे . अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा .—————————————————————————————————–
12.  बादलीत चेंडू टाकणे   – 
एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल /  vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे . प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबलायावर क्रमांक ठरवावा .———————————————————————————————————–
13. संदेश  पोचवणे  
या खेळात १० - १५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे . त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे . अश्या प्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे . आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते .
________________________________________________________________________
14. आंधळी  कोशिंबीर  – 
हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकीच्या मुलांनी एक वर्तुळकरून आत थांबावे . डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी . त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात . पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्यामुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा .———————————————————————————————————–
 15.  विष – अमृत  –
एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील . त्यांना एक मुलगा शिवायला जाईल . तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्या मुळे त्याने खाली बसावे . दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे . अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो . विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्या पासून थांबवावे.