Friday, 19 February 2016

राजमाता जिजाऊ


 राजमाता जिजाऊ


Image result for jijabaiजिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) (इ.स. १५९८- १७ जून, इ.स.१६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
जीवन
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.

Thursday, 14 January 2016

ज्ञानरचनावादी  वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :-

झाकणे
प्रकल्पासाठी चित्र कागद
तक्ते
वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
प्लास्टिक बॉक्स
पणत्या सुगडे
रंगीत खडे
गारगोट्या
कापुस
लोहचुंबक
भिंग
दुर्बीण
सेल बल्ब
सोलर पॉवर
छोटी मोटार
थर्माकोल च्या गोळया
लेस
टाचण्या
स्टेपलर
धान्यपदार्थ नमुणे
पंचिंग टोच्यालेस
शेंगांची टरफले
पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
वाळलेले भोपळे
विविध बिया
डबे
 माऊंट बोर्ड
 ड्रॉइंग पेपर
 प्रकल्प पुस्तके
 चार्ट चित्र
 थर्माकोल शीट
 फाईल
 फेविकॉल
 कटर
 कात्री
 वेल्वेट कपडा
 दाब पिन
 मार्कर पेन
 स्केच पेन
 पट्टी
 नोटा सत्यप्रती
 डिंक
 रंग - ब्रश
 चिकट टेप रंगीत टेप
 वेगवेगळ्या आकाराचे बटण ग्लास,   
     डिशबॉक्सट्रेबरणीचमचेकाड्या,
     स्ट्रॉमणी,सुई,दोरारंगीत दोरे काचेचे ग्लास कापड ,
 गोट्या
 वर्तमान पत्र रद्दी
 स्टिकर
 प्लास्टर अॉफ पँरीस PUP
 खळ
 पताका कागद
 मार्बल पेपर
 काचेच्या पट्या
 बांगड्या
 बांगडीच्या काचा
 मेणबत्या
 काडेपेट्याव काड्या
 खोके
 सुतळी तंगुस
 चित्रकला वही पुस्तक
 कार्यानुभव वही पुस्तक
पोस्टकार्ड
बाभळीचे काटे
मोजपात्र
चंचुपात्र परिक्षा नळ्या
 स्प्रे पंप बाटली
खेळणीप्राणी वाहणेडॉक्टर किटभांडीकुंडीव इतर मॉडेल
चिमटे
नारळ करवंट्या
कला कार्यानुभवासाठी साहित्य
 व इतर आनुषंगिक साहित्य.
`````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````` 
१) भाषा
 अक्षरकार्ड
 शब्दकार्ड
 शब्दपट्टया
 वाक्यपट्टया
 स्वरचिन्हाधारीत शब्द
 जोडशब्द
 कविताफलक
  इंग्रजी अक्षरे
 मराठी-इंग्रजी वाक्ये
 व इतर आनुषंगिक साहित्य.

```````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
२ )इंग्रजी

 इंग्रजी अक्षरे
 मराठी-इंग्रजी वाक्ये
 Singular-plural
 Verb form
 Word Hanger
 Related words
 Rhyming words
 Synonymous
 Antonyms
 Capital-Small letters
 Word formation
        And some essential !

````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
   
३)गणित

@संख्याकार्ड
अंककार्ड
भौमितीक आकार
@लहान-मोठालांब -आखुड,उंच-ठेंगणा
@नाणी -नोटा
@घड्याळ
@चित्र स्टँम्प
@बेरीज- वजाबाकी मॉडेल
@मनी माळा
@उजळणी अंकात - शब्दात
@चिन्ह +  -  × ÷ = <  >
रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
@दोन-तीनचार-पाचसहा-सात अंकी संख्या घरे
@वर्ग व वर्गमुळ
लहान-मोठे संख्या
 व इतर आनुषंगिक साहित्य